युद्धग्रस्त युक्रेनमधील ६८८ भारतीय नागरिक रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअर इंडियाच्या तीन विमानांतून रविवारी देशात परत आले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरु केलीय. रविवारी सकाळी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शिंदेंनी मोदींचा अनेकदा उल्लेख केल्याचं पहायला मिळालं. मात्र आता भारत सरकारच्या याच ‘ऑपरेशन गंगा’संदर्भातील मोदी सरकार जाहीरातबाजी करत असल्याचं म्हणतं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर टीका केलीय. या मोहिमेच्या नावावरही त्यांनी आक्षेप घेतलाय.

“१५०-२०० भारतीयांना मायदेशी आणून मोदी सरकार डंका पिटतंय. जाहीरातबाजी करतंय. युक्रेनमध्ये १५ हजारहून अधिक भारतीय अडकलेत,” असा टोला राऊत यांनी लगावलाय. भारतीय मुलांना मारहाण होतेय, केंद्र सरकार मागे पडतंय असं वाटतं का?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “नक्कीच” असं म्हटलं. “आतापर्यंत जगात अनेक युद्धं झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते,” असंही राऊत ‘टीव्ही ९ मराठी’शी म्हणालेत.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
murbad assembly constituency shinde shiv sena vaman mhatre meet mlc milind narvekar
शिंदेंचा पाईक मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला
Prakash Govind Mhatre
कल्याण ग्रामीण शिंदे शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

नक्की वाचा >> Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

पुढे बोलताना त्यांनी या मोहिमेच्या नावावर आक्षेप घेतला. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘ऑपरेशन गंगा’ नाव देण्यात आलं आहे, अशी टीका त्यांनी केली. “उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ‘ऑपरेशन गंगा’. देशाची मुलं संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय. पक्षाचा प्रसार दिसतोय तर त्याला मी राष्ट्रीय बाणा म्हणत नाही,” असा टोला राऊत यांनी लागवला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीयन महासंघाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले, “पहिल्यांदाच आम्ही हल्ला झालेल्या…”

“मी विद्यार्थ्यांचा पालकांचा आक्रोश पाहतोय. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण होतेय. त्यांना मारहाण होतेय. त्यांच्याकडचे पैसे संपलेत. त्यांना येण्याचा मार्ग दिसत नाहीयत. या देशात किंवा जगात अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. सरकारने राजकारण, प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,” असंही राऊत म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”

दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सरकार करते आहे. शनिवारपासून भारताने तेथे अडकलेल्या आपल्या ९०७ नागरिकांना परत आणले आहे. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुखारेस्टहून आलेल्या विमानाने २१९ लोक शनिवारी मुंबईत उतरले.

नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन

 २५० भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्टहून निघालेले दुसरे विमान रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरले. त्यापूर्वी, २४० प्रवासी असलेले तिसरे विमान बुडापेस्टहून निघून सकाळी ९.२० वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. यानंतर १९८ प्रवाशांसह एअर इंडियाचे आणखी एक विमान बुखारेस्टहून निघून सायंकाळी ५.३५ वाजता दिल्ली विमातनळावर उतरले.