पीटीआय, कोलकाता
कोलकात्यामधील सरकारी आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याला कोलकातामधील सियालदह न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवले. याप्रकरणी सोमवारी दुपारी १२.३० वाजता रॉयची बाजू ऐकून घेतली जाईल, तसेच त्याच दिवशी त्याला शिक्षा सुनावली जाईल असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय रॉय याला न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४अंतर्गत बलात्कारासाठी आणि कलम ६६ व १०३(१)अंतर्गत हत्या व मृत्यूसाठी दोषी ठरवण्यात आले. न्यायाधीशांनी सांगितले की रॉय डॉक्टरवर बलात्कार केल्याबद्दल आणि तिचा गळा आवळून हत्या केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळले आहे. सीबीआयने त्याच्यावर ठेवलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. मात्र, न्यायाधीश निकाल देत असताना आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले असल्याचा रॉय याने दावा केला. मी गळ्यामध्ये रुद्राक्ष परिधान करतो आणि जर मी गुन्हा केला असता तर तो तुटला असता असा युक्तिवाद त्याने केला.

हेही वाचा : Kolkata RG Kar Doctor Case Verdict : साडेपाच महिन्यांत निकाल, समाजाच्या सर्व थरांतून पश्चिम बंगाल सरकारवर सातत्याने दबाव

सियालदह रुग्णालयात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हा खटला चालवण्यात आला. या प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन खटल्याशी संबंधित नसलेल्यांना खटला सुरू असता उपस्थित राहू दिले जात नव्हते. शनिवारी निकाल लागल्यानंतर पोलीस कडेकोट सुरक्षेमध्ये रॉयला प्रेसिडेन्सी सुधारगृहात घेऊन गेले. यावेळी प्रसारमाध्यमांना त्याच्याशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती.

कुटुंबीयांकडून आभार

निकालानंतर मृत डॉक्टरच्या आई-वडिलांनी न्यायालयाचे आभार मानले. आपण न्यायालयावर विश्वास ठेवला तो त्यांनी सार्थ ठरवला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र, या खटल्यात संजय रॉय एकमेव दोषी नसून त्याच्याबरोबर इतरही काहीजण होते असे पीडितेच्या आईने सांगितले. जिवंत असेपर्यंत न्याय मिळवण्यासाठी मी आणि माझे पती लढा देत राहू असे त्या म्हणाल्या. सियालदह न्यायालयात निकाल सुनावला जात असताना बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : Kolkata RG Kar Doctor Case : “मला गोवण्यात आलं, पण यात एका आयपीएसचा…”, न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आरोपी संजय रॉय काय म्हणाला?

जैविक पुराव्यातून संजय दोषी असल्याचे सिद्ध झाले होते आणि न्यायालयात खटला सुरू असताना तो गप्प होता, त्यावरूनही माझ्या मुलीचा छळ करून तिची हत्या करण्यात त्याचा हात असल्याचे सिद्ध होते. पण तो एकटा नव्हता. त्याच्याबरोबर इतरही काही जण होते. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय झालेला नाही. सर्वांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला झोप लागणार नाही.

मृत डॉक्टरची आई