Sanjay Singh on Wrestler Protest : जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. याचा परिणाम म्हणून भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये सर्वात कमी पदके जिंकली आहेत, असा दावा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांनी केला आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षाभरापासून चालू असलेल्या आंदोलनामुळे कुस्तीपटूंना नियमित सराव करता आला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही, असं संजय सिंग म्हणाले. ब्रिजभूषण सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर संजय सिंग यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.

“आंदोलकांनी जवळपास १४ ते १५ महिने आंदोलन केले. त्यामुळे सर्व कुस्तीपटूंचं लक्ष विचलित झालं होतं. फक्त एका कॅटेगिरीपुरतं नव्हे तर कुस्तीतील इतर कॅटगिरीतील स्पर्धकही योग्य सराव करू शकले नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील टुर्नामेंट सहभागी न झाल्याने त्यांचा योग्य सराव झाला नाह. परिणामी ते ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत”, असं संजय सिंग म्हणाले.

हेही वाचा >> Vinesh Phogat : विनेश फोगटची प्रतीक्षा पुन्हा वाढली… आता रौप्यपदकासाठीचा क्रीडा लवादाचा निर्णय ‘या’ दिवशी येणार

महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंग यांची चौकशी झाली. या चौकशीनंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. परिणामी त्यांना या पदावरून हटवण्यात आलं आणि संजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, पुन्हा ब्रिजभूषण सिंग यांच्या निकटवर्तीयांकडेच हे पद गेल्याने साक्षी मलिकने खेळातून निवृत्ती घेतली. कुस्तीत पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे.

विनेशची प्रतिक्षा कायम

विनेशने ६ ऑगस्ट रोजी सलग ३ सामने जिंकून ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केले होते. कारण सुवर्णपदकाचा सामना ७ ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्याच दिवशी सकाळी विनेशला अपात्र ठरवण्यात आले कारण सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते.

पहिल्यांदा तिला सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत तिची मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यानंतर विनेशने तिला या स्पर्धेत रौप्यपदक मिळावी, अशी विनंती केली. यावर क्रीडा लवादाकडून १० ऑगस्टल निर्णय येणार होता. मात्र, तो नंतर २४ तासांनी पुढे म्हणजे ११ ऑगस्टवर ढकला. यानंतर हा निर्णय ११ वरुन १३ आणि आता १६ ऑगस्टवर गेला ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा विनेशकडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay singh says we lost paris olympic 2024 due to wrestler protest sgk