Sanjoy Roy : कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी मागच्या आठवड्या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि त्यानंतर त्या महिला डॉक्टरची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. यानंतर आता या प्रकरणात रोज नवे पैलू समोर येत आहेत. अशात आता आरोपी संजय रॉय ( Sanjoy Roy ) हा विकृत मनोवृत्तीचा माणूस होता आणि तो माझ्या मुलीला रोज मारहाण करायचा अशी माहिती त्याच्या सासूने दिली आहे.
नेमकी ही घटना काय घडली?
कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. आता या प्रकरणात संजय रॉयच्या ( Sanjoy Roy ) सासूची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी संजय रॉय विकृत माणूस आहे असं म्हटलं आहे ANI ला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉय ( Sanjoy Roy ) त्यांच्या मुलीवर कसे अन्याय करायचा ते पण सांगितलं आहे.
संजय रॉयच्या सासूने काय सांगितलं?
“संजय रॉय ( Sanjoy Roy ) आणि माझ्या मुलीचं लग्न होऊन दोन वर्षे झाली. पण तो माझ्या मुलीला रोज मारायचा. तिला सुखाने जगू देत नव्हता. तिला मारहाण केल्याने तिचा गर्भपातही झाला. त्यावेळी माझी मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती. आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली. त्यानंतर पोलिसांनी ती नोंदवली आम्हाला सांगितलं की पुन्हा असं केलं तर आम्हाला सांगा. मी पोलिसात काम करतो असंच आम्हाला त्याने सांगितलं. संजय रॉय ( Sanjoy Roy ) आणि माझं नातं अजिबात चांगलं नव्हतं. कारण त्याने माझ्या मुलीचा कायम छळच केला.” असं संजय रॉयच्या सासूने सांगितलं.
संजय रॉयला फाशी दिली तरी आम्हाला काही घेणंदेणं नाही
“संजय रॉयचं आधी एक लग्न झालं होतं. त्याने त्या महिलेला रितसर घटस्फोट दिला. त्याने माझ्या मुलीशी लग्न करण्याआधी त्याने त्या महिलेला घटस्फोट दिला. त्याच्या बहिणी पोलिसात आहेत. त्यापण तेव्हा आल्या होत्या. त्याची सगळी चौकशी करुनच आम्ही लग्न लावून दिलं होतं. त्यानंतर सहा महिने सगळं बरं चाललं होतं. पण तो रोज तिला मारहाण करायचा. तिचा गर्भपात झाल्यावर ती आजारी झाली. त्यानंतर ती माझ्या घरी निघून आली. आमच्या घरातच आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला. संजय रॉयने एकट्याने त्या मुलीला मारलं नसावं. पण त्याला फाशी द्या किंवा काहीही करा आम्हाला काहीही घेणंदेण नाही. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.”
© IE Online Media Services (P) Ltd