Ayodhya Ram Mandir Inauguration : “सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी”, या शंकराचार्यांच्या भूमिकेमुळे चार शंकाराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यावर, संस्कृत विज्ञान पद्म विभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही. मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित नियामांकडे दुर्लक्ष करत आहे”, अशी भूमिका शंकाराचार्यांनी मांडल्याने चार शंकाराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. परंतु, यावर स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, “प्राणप्रतिष्ठा सोहळा हा शास्त्रानुसार होत आहे, कारण या मंदिराचा गाभारा पूर्ण झाला आहे. १४ वर्षांनंतर भगवान राम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांची जी प्रतिक्रिया होती, तशीच प्रतिक्रिया आता माझी आहे. माझ्या आनंदाला आज पारावार उरलेला नाही.”

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११ दिवसांचा उपवास ठेवला आहे. यावरून स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “११ दिवस उपवास ठेवणारा पंतप्रधान कधी तुम्ही पाहिला आहे का?” याचा अर्थ असा की गाभारा पूर्ण असल्याने प्राणप्रतिष्ठा सोहळा अधार्मिक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्यांचा विरोध का? चारही शंकराचार्य अनुपस्थित राहणार?

महत्त्वाचं म्हणजे, स्वामी रामभद्राचार्य हे अयोध्येत एक विशेष यज्ञ करत आहेत. पाकिस्तानने व्यापलेला काश्मीर भारताला मिळावा याकरता हे यज्ञ करण्यात येणार आहे. याबाबत ते म्हणाले की, “पाकिस्तानकडे असलेले काश्मीर भारताला मिळावे याकरता उद्यापासून (१६ जानेवारी) अयोध्येत एका विशेष यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जर हनुमान सीतामातेला परत आणू शकतात तर ते आपली भूमीही परत आणू शकतात.”

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून वादंग

अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाला भव्य स्वरूप देण्यासाठी अयोध्येत तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असून देशभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र हिंदू धर्मात मानाचे स्थान असलेल्या शंकराचार्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. 

हेही वाचा >> राम मंदिर सोहळ्यात चार शंकराचार्यांचा सहभाग का नाही?, स्वामी निश्चलानंद म्हणाले, “कुठलाही अहंकार नाही, मात्र…”

अयोध्येतील श्री राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे काय?

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित असलेल्या ट्रस्टने सांगितले की, तीन मजली मंदिराचा पहिला मजला तयार आहे, परंतु उर्वरित बांधकाम पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. मात्र २२ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. कार्यक्रमाला शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याबाबत मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, ‘‘हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे, शैव, शाक्य आणि संन्याशांचे नाही. अठराव्या शतकातील वैष्णव संत स्वामी रामानंद यांच्या शिष्यांनी निर्मोही अणी, दिगंबर अणी आणि निर्वाणी अणी हे तीन आखाडे स्थापन केले होते. त्यांनी निंबार्क, रामानंद आणि मध्वगोडेश्वर या चार उपपंथांची स्थापना केली. रामानंद पंथाने विष्णूचा अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे केवळ पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले.