सरकारने मांस निर्यातीवरच्या बंदीची अंमलबजावणी केली नाही तर आपण संथारा व्रत करून मरण पत्करू, असा इशारा एका जैन धर्मगुरूने दिला आहे. प्रभू सागरमहाराज यांनी सांगितले, की जर सरकारने १७ जानेवारीपर्यंत मांसबंदी लागू केली नाही तर संथारा व्रत सुरू करू. भारताला पुरेसे परकीय चलन मिळत असून, त्यासाठी मांस विकून परकीय चलन मिळवणे आता आवश्यक नाही. दुग्धोत्पादक गाईगुरांची कत्तल चालू राहिली तर लोकांना दूध मिळणार नाही. जैन धर्मगुरूंनी उत्तर प्रदेशचे आझम खान यांना असे आवाहन केले, की मांस निर्यातीवर बंदीला पाठिंबा द्यावा.

Story img Loader