पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचे बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्याच्यावर लाहोरमधील जिना रुग्णालयात गेल्या एक आठवड्यापासून उपचार सुरू होते. ह्रदयविकाराचा झटका आल्य़ाने सरबजितची प्राणज्योत मालवल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर सरबजितचा मृतदेह भारताकडे देण्यात येणार आहे.
सरबजितवर पाकिस्तानातील कारागृहात इतर कैद्यांकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एक वाजता सरबजितचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी मला कळविल्याची माहिती जिना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मोहमद शौकत यांनी दूरध्वनीवरून ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.
सरबजितच्या निधनाची माहिती पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आलीये.
सरबजितचे कुटुंबिय बुधवारी दुपारीच पाकिस्तानातून भारतात परतले होते. सरबजितवर आणखी चांगले उपचार व्हावेत, यासाठी त्याचे कुटुंबिय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचीही भेट घेणार होते.
सरबजितसिंगची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, मृतदेह भारताकडे देणार
पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचे गुरुवारी पहाटे एक वाजता निधन झाले. त्याच्यावर लाहोरमधील जिना रुग्णालयात गेल्या एक आठवड्यापासून उपचार सुरू होते. ह्रदयविकाराचा झटका आल्य़ाने सरबजितची प्राणज्योत मालवल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.
First published on: 02-05-2013 at 06:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabjit singh dies in lahore hospital