हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानातील तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंगवर तरुंगात झालेल्या हल्लानंतर तो कोमात गेला असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सरबजित सिंगची प्रकृती स्थिर होईपर्यंत कोणतीही सर्जरी करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लाहोरमधील कोट लखपत कारागृहात जवळपास सहा कैद्यांनी सरबजित सिंगला मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लाहोरमधील जिना रुग्णालयात सरबजितवर उपचार सुरू आहेत.
संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर लाहोरमधील कोट लाखपत तुरुंगात कैद असलेल्या सरबजितवर हल्ला करण्याचा तुरुंगातील इतर कैद्यांचा कट होता. शुक्रवारी सरबजित एका बराकीतून दुसरीकडे जात असताना त्याच्या डोक्यावर या कैद्याने फटका मारला. त्यात सरबजित जबर जखमी झाला.
दरम्यान, सरबजितवर झालेल्या हल्ला प्रकरणावर भारत-पाक सरकारी सूत्रांच्या पातळीवर मौनच बाळगण्यात आले.
भारतीय कैदी सरबजित सिंग कोमात, प्रकृती स्थिर होईपर्यंत सर्जरी अशक्य
हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानातील तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंगवर तरुंगात झालेल्या हल्लानंतर तो कोमात गेला असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सरबजित सिंगची प्रकृती स्थिर होईपर्यंत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-04-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabjit singh in deep coma no surgery till his condition stabilises