कोट लखपत तुरुंगात कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला सरबजित सिंग याची प्रकृती फारच खालावली आहे. त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित करण्यात आले नसले तरी परिस्थिती जवळपास तशीच आहे. अलामान इक्बाल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य महमूद शौकत हे सरबजितवर देखरेख करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख असून त्यांनी सरबजितची प्रकृती फारच खालावली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सरबजितची प्रकृती गंभीर आहे, पण त्याला ब्रेनडेड घोषित केलेले नाही. आमच्या अलीकडच्या तपासणीनुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणेची कुठलीही चिन्हे नसून प्रकृती उलट खालावली आहे.
सरबजित याला जिना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे. शौकत यांनी सांगितले की, वरिष्ठ मेंदूशल्यविशारद व डॉक्टर सरबजितवर चांगले उपचार करीत असून त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. प्रकृती ढासळल्यानंतर डॉक्टरांनी त्याची काही औषधे बदलली आहेत. सरबजितचे दुसरे सीटीस्कॅन करण्यात आले, त्यातही फारशी प्रगती दिसून आलेली नाही. ग्लासगो कोमा स्केलच्या आधारे रोज सरबजितची तपासणी केली जात आहे. यापूर्वी सरबजितची ग्लासगो कोमा स्केल (जीसीएस) ५ असल्याचे सांगण्यात आले होते, त्यामुळे त्याच्या चेतासंस्थेला मोठी इजा झालेली आहे. जीसीएस ३ ते १५ पर्यंत असू शकते व त्यावरून रुग्णाची शुद्ध कितपत आहे हे समजते.
दरम्यान, सरबजितची बहीण दलबीर कौर यांनी सरबजितवरील उपचारांसाठी भारतीय डॉक्टरांना पाचारण करावे अशी मागणी केली आहे. जिना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एजाज निसार यांनी आज सरबजितची पत्नी, बहीण व दोन मुली यांना त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. श्रीमती दलबीर कौर या भारतात परत येत असून त्या सरबजितच्या उपचाराबाबत सल्ला घेणार आहेत. पंजाब सरकारने तुरुंगाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
सरबजितची प्रकृती आणखी खालावली
कोट लखपत तुरुंगात कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला सरबजित सिंग याची प्रकृती फारच खालावली आहे. त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित करण्यात आले नसले तरी परिस्थिती जवळपास तशीच आहे. अलामान इक्बाल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य महमूद शौकत हे सरबजितवर देखरेख करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख असून त्यांनी सरबजितची प्रकृती फारच खालावली असल्याचे सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabjit singhs condition deteriorates say pak doctors