शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या माध्यम विभागाचे मिथुन सदिच्छा राजदूत होते. त्यामुळे या कंपनीशी संबंधित सर्वाची चौकशी केली जाणार असल्याने मिथुन यांनाही बोलावले जाईल, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. मिथुन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शारदा घोटाळाप्रकरणी मिथुन यांचा जबाब नोंदवणार
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.
First published on: 14-07-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saradha scam cbi may record tmc mp mithun chakraborty