Sarah Rahanuma : बांगलादेशातला संघर्ष थांबायचं नाव घेताना दिसत नाही. आता एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराचा मृतदेह ढाका येथील तलावात आढळून आला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मुलाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे असं म्हटलं आहे. बांगलादेशातील न्यूज चॅनल गाझी टीव्हीची न्यूज एडिटर आणि अँकर साराह रहनुमाचा ( Sarah Rahanuma ) मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक माध्यमांनी काय म्हटलं आहे?

बांगलादेशातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार साराहचा मृतदेह एका तलावात तरंगताना आढळून आला. त्या ठिकाणी जे लोक चालले होते त्यांनी तिला तलावाबाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी साराहला ( Sarah Rahanuma ) मृत घोषित केलं. साराह बांगलादेशातल्या लोकप्रिय पत्रकारांपैकी एक होती.

साजीब वाजेद यांनी काय म्हटलं आहे?

गाझी टीव्हीची न्यूजरुम एडिटर साराह रहनुमाचा मृतदेह तलावात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ढाका शहरातील हातीरझिल तलावात तिचा मृतदेह आढळून आला आहे. गाझी टीव्ही ही गोलाम दस्तगीर गाझी यांच्या मालकीची वृत्तवाहिनी आहे. ही वृत्तवाहिनी धर्मनिरपेक्ष आहे असंही सांगण्यात येतं. गोलाम दस्तगीर गाझी यांना अलिकडेच अटक करण्यात आली होती. अशी माहिती साजीब वाजेद यांनी माध्यमांना दिली.

साराहची पोस्टही चर्चेत

साराहचा ( Sarah Rahanuma ) मृतदेह मिळण्याची जी घटना घडली या घटनेच्या काही तास आधीच तिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं ‘आपके जैसा दोस्त पाकर अच्छा लगता है, ईश्वर हमेशा आप पर कृपा बनाये रखे. मै जानती हूँ हमने बहुत सारी योजनाए बनाईं, माफ करना मै वो पुरी नहीं कर पायी. ‘ अशी पोस्ट साराहने केली होती. ज्यानंतर काही तासांनीच तिचा मृतदेह तलावात आढळून आला.

साराह म्हणाली होती यापेक्षा मृत्यू आलेला बरा

याचप्रमाणे साराहने अशी पोस्टही केली होती की मृत्यू प्रमाणे आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू आलेला चांगला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजिद म्हणाले ही घटना म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. साराहचे पती सय्यद शुवरो म्हणाले की ती कामावर गेली होती पण परतलीच नाही. आम्हाला हे सांगण्यात आलं की तिने आत्महत्या केली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarah rahanuma bangladesh tv anchor body found in lake scj