राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी न्यू यॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर प्लाझा येथे देशभक्तीपर गीत गायले आहे. त्यांच्या गायनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यांच्या या कलेचं कौतुकही केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशाने बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे स्वतंत्र अल्बमही आले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या ‘चांद्रयान ३’ चे यशस्वी लँडिंगचे यश साजरे करण्यासाठी २७ आणि २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. ‘नाविका कॅपिटल’चे नवीन शाह आणि ‘रॉयल अल्बर्ट पॅलेस’चे अल्बर्ट जसानी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी न्यूयॉर्कमधील ७०० ते १००० भारतीय नागरिाकांशी संवाद साधला. तसंच, यावेळी त्यांना सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीतही गायले.

तसंच, महिला सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल अमृता फडणवीस यांचा सन्मानही करण्यात आला. परराष्ट्र विभागाचे उपआयुक्त देव चौहान यांनी हा सन्मान प्रदान केला. ‘एक भारत’ च्या एकात्म भावनेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमात न्यूयॉर्कमधील भारताचे कॉन्सिल जनरल रणधीर जैसवाल, डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान हे विशेष अतिथी म्हणून आले होते.