जगभरातील प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बराक ओबामांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यावर रोखलेले असताना त्यांची धाकटी कन्या साशा हिने दिलेली जांभई नेमकी कॅमेरात टिपली गेली. आता या जांभईचेच छायाचित्र जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.
बराक ओबामा यांनी सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान ओबामा देशाचा आर्थिक गाडा पुन्हा मार्गाला कसा लागेल, त्यासाठी काय करावे लागेल, कोणती धोरणे राबवावी लागतील आदी मुद्दय़ांवर सविस्तर विवेचन करत असताना अकरा वर्षीय कन्या साशाने जोरदार जांभई दिली. साशाची ही जांभई कॅमेराबद्ध झाली आणि इंटरनेटवर तातडीने ती प्रसारित झाली. त्यावर आता अनेक टिप्पण्याही पडू लागल्या आहेत. भाषणानंतर मात्र साशाने बाबा ओबामांचे अभिनंदन केले. मागील भाषणापेक्षा यंदाचे भाषण अगदी सुंदर होते, मुख्यत ते रटाळ नव्हते अशी प्रतिक्रियाही साशाने नोंदवली!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा