भारत आणि नेपाळच्या सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) आपल्या मैदानावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्यास अनुमती नाकारली आहे. सदर मैदानावर बलाचे भरती केंद्र असून हे ठिकाण भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी २३ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेसाठी हे ठिकाण निश्चित केले होते. गोरखपूर शहराच्या उत्तरेकडे १२ कि.मी. अंतरावर सदर ठिकाण असून ते रेल्वे आणि भूमार्गाने जाणे सहज शक्य आहे. बलाच्या उपमहानिरीक्षकांनी परवानगी नाकारल्याने आदित्यनाथ यांनी आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सदर मैदान हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून तेथे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेले शस्त्रागार आहे. त्यामुळे त्याला परवानगी नाकरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत-नेपाळ सीमेवर मोदींच्या सभेला परवानगी नाकारली
भारत आणि नेपाळच्या सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) आपल्या मैदानावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्यास अनुमती नाकारली आहे.
First published on: 08-01-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sashastra seema bal officials deny permission for modis rally at their ground