इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांना सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल इंटरनॅशनल (एसएसपीआय) या संस्थेतर्फे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट केले जाणार आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पृथ्वीवर राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा घडविणाऱ्या, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा या यादीत समावेश केला जातो. यामुळे राव यांचा समावेश सर ऑर्थर क्लार्क, डॉ. जेम्स व्हॅन अॅलन, डॉ. हॅरॉल्ड रोसन यांसारख्या ४० मान्यवरांच्या पंक्तीमध्ये होणार आहे.
यू.आर. राव यांना ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम’
इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांना सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल इंटरनॅशनल (एसएसपीआय) या संस्थेतर्फे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
First published on: 20-01-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satelite hall of fame to u r rao