सध्या राजकीय वर्तुळात कर्नाटक विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगलेली असताना सट्टाबाजारही मागे राहिलेला नाही. एक्झिट पोल आणि सर्व्हेमधून निवडणुकीचं भाकित वर्तवलं जात असताना सट्टाबाजाराचंही निवडणुकीच्या निकालावर लक्ष लागलं आहे. सट्टाबाजारानुसार, कर्नाटक निवडणुकीत तिसरा पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणार असला तरी भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी मतदान पार पडले असून उद्या म्हणजेच मंगळवारी निकाल हाती येणार आहेत. एक्झिट पोलनुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे, सट्टा बाजारातील गणितं पुन्हा नव्याने मांडण्यात आली आहेत. बुकीजनुसार, भाजपा ९६ ते ९८ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ८५ ते ८७ जागा मिळू शकतात.

सध्या सट्टा बाजारात एक पे एक ट्रेंड सुरु असून जर एखाद्याने भाजपावर १ लाख रुपये लावले, आणि पक्षाला ९८ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर त्याला २ लाख रुपये मिळतील.

‘मार्केटमध्ये भाजपाला सर्वात जास्त पसंती दिली जात आहे’, असं राजस्थानमधील कृष्ण गोपाळ यांनी सांगितलं आहे. त्यांनीही मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत. ‘निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून, पंटर्सना दिवसाअखेर भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल अशी अपेक्षा आहे. तिसऱ्या पक्षाच्या मदतीने ते सरकार स्थापन करतील’, असं त्यांनी म्हटलं आहे.

जनता दल किंगमेकर म्हणून समोर येण्याची शक्यता असून ३२ ते ३५ जागा जिंकू शकतात. जर एखाद्याने २२४ जागांपैकी १२५ जागांवर पैसे लावले, तर एक लाखाच्या गुंतवणुकीवर पाच लाख कमावण्याची शक्यता होती. मात्र एक्झिट पोल समोर आल्यानंतर हा आकडा तीन लाखांवर आला आहे. दुसरीकडे भाजपाला १०० ते ११० जागा मिळाल्यास एक रुपयामागे दोन रुपये मिळणार आहे.