जन्माने भारतीय असलेले सत्य नाडेला हे आता ‘मायक्रोसॉफ्ट’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होणार हे जवळपास निश्चित झाले असून ते सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बॉलमेर यांची जागा घेतील.
अभियांत्रिकी पाश्र्वभूमी असलेले नाडेला हे सध्या या पदासाठी असलेल्या पर्यायात सरस ठरले आहेत. नाडेला हे मूळ हैदराबादचे असून ते बराच काळ ते मायक्रोसॉफ्टमध्ये अधिकारी आहेत. त्यांनी क्लाउड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योजकता व क्लाउड कॉम्प्युटिंग हे दोन मुद्दे त्यांच्या बाजूने वरचढ ठरले आहेत, असे न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीत काही बदल घडवायचे असतील तर नाडेला यांनाच मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात यावे यावर अनेकांचे मतैक्य आहे. कंपनीच्या मंडळाने अजून बॉलमेर यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली नसली तरी विक्री अधिकारी केव्हीन टर्नर व टोनी बेटस यांच्या मुलाखती या पदासाठी झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा