Terror Attack On Christmas Market In Germany: जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने खरेदी करत असलेल्या लोकांवर हल्ला करत कारने उडवले. यामध्ये एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात नसून, ठरवून केलेला हल्ला आहे. हा हल्ला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला आहे. दरम्यान पोलिसांनी मृतांची संख्या वाढू शकते अशी माहिती दिली आहे.

सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे पंतप्रधान रेनर हॅसेलॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हॅसेलॉफ म्हणाले की, “प्राथमिक माहितीवरून असे दिसते की, चालकाने एकट्याने हा हल्ला केला आहे. त्याला अटक केल्यामुळे शहराला आता कोणताही धोका नाही.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे

काय असतात ख्रसमस मार्केट्स?

मॅग्डेबर्ग शहर सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याची राजधानी आहे. या शहराची अंदाजे २४०,००० इतकी लोकसंख्या आहे. आठ वर्षांपूर्वी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये अशीच एका घटना घडली होती. त्यावेळी एका ट्रकने ख्रिसमस मार्केटमध्ये १३ जणांना चिरडले होते.

ख्रिसमस मार्केट ही जर्मनीतील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी लाखो लोक ख्रिसमच्या खरेदीसाठी त्याकडे आकर्षित होतात.

हे ही वाचा : डॉ.आंबेडकर यांच्याविरोधातील वक्तव्याचे गुजरातमध्येही पडसाद; अमित शाहांची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार!

कोण आहे आरोपी?

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात शुक्रवारी सायंकाळी ख्रिसमस मार्केटच्या गर्दीवर कार हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव तालेब असे आहे. पेशाने डॉक्टर असलेला आरोपी ५० वर्षांचा आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, तालेब ए. मानसोपचारतज्ञ आहे. तो २००६ पासून जर्मनीत राहत होता आणि २०१६ मध्ये त्याला निर्वासिताचा दर्जा मिळाला होता.

हे ही वाचा : “तेल आणि गॅस अमेरिकेकडूनच विकत घ्या, नाहीतर…” डोनाल्ड ट्रम्प यांची नवी धमकी कोणाला?

घटनास्थळी काय घडले?

जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये एक कार गर्दीत घुसल्याने एका लहान मुलासह किमान दोघांची बळी गेला. शहराच्या प्रशासनाने या हल्ल्यात ६८ जण जखमी झाल्याची नोंद केली असून, १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू टाऊन हॉलजवळ गर्दीत ४० मीटर आतपर्यंत घुसली होती. दरम्यान या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Story img Loader