रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच सर्व बँकांना गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याची सुचना केली होती. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. सोमवार १३ एप्रिलपासून ही कपात लागू करण्यात येणार आहे.
एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात केल्याने आता गृहकर्जाचा व्याजदर महिलांसाठी ९.९५ टक्के आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी १० टक्के असणार आहे.   यापूर्वी एचडीएफसीने आपल्या व्याजदरात ०.२० टक्क्यांची कपात करत व्याजदर ९.९ टक्क्यांपर्यंत आणला होता.