सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) CBSE राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) Neet Result निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने ‘नीट’चे निकाल जाहीर करण्याला स्थगिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत ‘नीट’चे निकाल राखून ठेवले जावेत, असे हायकोर्टाने म्हटले होते. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून आजच्या सुनावणीदरम्यान ही स्थगिती उठवण्यात आली. तसेच नीट परीक्षेचा निकाल तात्काळ म्हणजे आजच्या आज जाहीर केला जावा, असेही न्यायालयाने म्हटले. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याने न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठीची मुदत वाढवून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Neet Result: नीट परीक्षेचा निकाल २६ जून आधी; सुप्रीम कोर्टाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) CBSE राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) Neet Result निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने ‘नीट’चे निकाल जाहीर करण्याला स्थगिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत ‘नीट’चे निकाल राखून ठेवले जावेत, असे हायकोर्टाने म्हटले होते. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर […]
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-06-2017 at 11:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc allows cbse to declare neet results stays madras hc interim order restraining publication of results of neet for admission to mbbs and bds