भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदभार स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती नेमण्यात येणार आहे. या समितीच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असेही आदेश न्यायालयाने श्रीनिवासन आणि बीसीसीआयला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या समितीला चार महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीला आयपीएलमधील सट्टेबाजी, चेन्नई सुपर किंग्जचे सहमालक गुरुनाथ मयप्पन यांचा सट्टेबाजीशी संबंध होता का, राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकांचा याच्याशी काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणानंतर बिहार क्रिकेट मंडळाने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा निकाल दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा