गुजरातमधून आशियाई सिंहांचे स्थलांतरण करून त्यांना मध्य प्रदेशात नेण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. आशियाई सिंहाची प्रजाती लोप पावण्याचा धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. सी. के. प्रसाद यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सोमवारी स्थलांतरणाबाबतच्या निर्णयास मान्यता देताना वन्यजीव प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. गुजरात येथील गिर अभयारण्यात सध्या सुमारे ४०० आशियाई सिंहांचे वास्तव्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा