सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱया प्रशिक्षणार्थी वकील तरुणीवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. ही याचिका दाखल करून घेता येणार नाही, असे सरन्यायाधीश पी. सथाशिवम आणि न्या. रंजन गोगोई यांच्या पीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयातील वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. पीडित तरुणीने केलेल्या आरोपांना प्रसिद्धी दिल्याबद्दल एक संकेतस्थळ आणि एका राष्ट्रीय वृत्तपत्रावर कारवाई करण्याची मागणीही शर्मा यांनी याचिकेमध्ये केली होती. आम्ही तुमचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेतला. कायद्यामध्ये तुमच्याकडे इतर काही पर्याय उपलब्ध असतील, तर त्याचा विचार करा, असे पीठाने स्पष्ट केले.
पीडित तरुणीचे आरोप आणि त्याला संकेतस्थळ आणि राष्ट्रीय वृत्तपत्राने दिलेली प्रसिद्धी बदनामीकारक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. देशातील न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा