EVM Tampering Supreme Court Views: भारतातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची मागणी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. यावेळी याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत असे नमूद केले होते की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांसारख्या नेत्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावर उत्तर देताना खंडपीठ म्हणाले, “जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा जगन मोहन रेड्डी जिंकतात तेव्हा ते काहीही बोलत नाही पण हरले की म्हणतात, ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे.”

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने केए पॉल यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली. याचिकेत भारतातील मतदानासाठी प्रत्यक्ष कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली होती.

केए पॉल यांच्या याचिकेत काय?

केए पॉल त्यांच्या याचिकेत म्हणाले होते की, “ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते आणि भारताने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी कागदी मतपत्रिका वापरण्याची पद्धत पाळली पाहिजे. ईव्हीएम लोकशाहीला धोका आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांसारख्या व्यक्तींनी ईव्हीएम छेडछाडीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती.”

…तर उमेदवाराला निलंबीत करावे

केए पॉल यांनी त्यांच्या याचिकेत, निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान पैसे, दारू आणि इतर प्रलोभने देण्यात दोषी आढळल्यास उमेदवारांना किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे निर्देश जारी करण्यासह इतर मागण्या केल्या होत्या.

हे ही वाचा: महाराष्ट्राला आत्तापर्यंत किती मुख्यमंत्री लाभले माहितीये? सर्वाधिक काळ कोण होतं पदावर? वाचा ही यादी!

हे ही वाचा: मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला

६ पक्षांना १२०० कोटी दिले

यावेळी न्यायालयासमोर पॉल यांनी असाही दावा केला की, गेल्या काही निवडणुकांमध्ये पैसे वाटले गेले आहेत. एका उद्योगपतीने काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीसह सर्व प्रमुख ६ पक्षांना १२०० कोटी रुपये दिले आहेत.

महाराष्ट्रातही ईव्हीएमवरुन गोंधळ

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनात पार्टीच्या नेतृत्त्वाखालील महायुतीने २३० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी पक्षांच्य महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ५० जागा आल्या आहेत. यानंतर विरोधी पक्षांसह अनेक लोकांना ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात काही ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा उमेदवारांना जास्त मते पडल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत.

Story img Loader