स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्यावरील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्या. ए. के. पटनाईक यांच्या नेतृत्त्वाखाली पीठाने हा निर्णय दिला. अल्पवयीन मुला-मुलींवरील गुन्ह्यांची जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयाने फेटाळली. अशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार कायदे मंडळाला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. चेन्नईमधील डी. आय. नॅथन यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.
आसाराम बापूंची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली
अल्पवयीन मुला-मुलींवरील गुन्ह्यांची जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयाने फेटाळली.
First published on: 23-09-2013 at 06:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc dismisses plea of cbi probe against asaram