‘सहारा समूहा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यावर न्यायालयाच्या आवारात शाई फेकणाऱ्या मनोज शर्मा या तरुणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने सु मोटू याचिका दाखल करून घेतली असून, त्याला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
रॉय यांच्यावर शाईफेक करून मनोज शर्माने न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. त्यामुळे या प्रकरणी त्यावर खटला दाखल करून आरोपपत्र ठेवण्यात येणार आहे, असे न्या. आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने सांगितले.
शर्मा याच्या या कृतीमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा त्याला नोटिशीद्वारे करण्यात आली आहे, असे या खंडपीठाने सांगितले. शर्माने तीन आठवडय़ांत या नोटिशीला उत्तर द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा