स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राजस्थान सरकारला नोटीस बजावली आहे. आसाराम बापूंच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक नेमण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या वैद्यकीय पथकाने आपला अहवाल २३ सप्टेंबरपूर्वी न्यायालयाकडे सादर करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जोधपूरमधील बलात्काराच्या आरोपानंतर गेल्या वर्षी २ सप्टेंबर रोजी आसाराम बापूंना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते जोधपूरमधील तुरुंगात आहेत. राजस्थानमधील उच्च न्यायालयाने याआधी आसाराम बापूंची जामीन याचिका फेटाळली आहे. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Story img Loader