सोहराबुद्दिन शेख चकमकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अमित शाह यांना दिलासा दिला. प्रत्येक पंधरवड्याच्या शनिवारी सीबीआयसमोर हजरी लावण्याची घातलेली अट न्यायालयाने सोमवारी रद्द केली. न्यायालयाने शाह यांना जामीन मंजूर करताना घातलेल्या इतर सर्व अटी कायम ठेवून केवळ एवढी एकच अट रद्द करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश पी. सथाशिवम आणि न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सोहराबुद्दिन शेख चकमक खटल्याची सुनावणी गुजरातबाहेर मुंबईला हलविण्यात आलीये. त्याचबरोबर शाह यांची गुजरात विधानसभेवर निवड झाली असून, भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदीही त्यांची नियुक्ती झाली असल्याचा मुद्दा न्यायालयाने निर्णय देताना विचारात घेतला.
शाह हे या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, असा युक्तिवाद करीत सीबीआयच्या वकिलांनी शाह यांना ही सूट द्यायला नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc modifies bail condition of gujarat mla amit shah
Show comments