सर्वोच्च न्यायालय बॉम्बने उडवून देऊ अशा आशयाच्या धमकीचा ईमेल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला मिळाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला हा ईमेल मिळाल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. त्यानंतर सुरक्षेचा भाग म्हणून शिकाऊ वकिलांना सुप्रीम कोर्टात जाण्यास बंदी घालण्यात आली असून किरकोळ कामाकरता गेट पास घेऊन येणा-या आगंतूकांनाही भेट नाकारण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांना सुरक्षेचा फेरआढावा घेतानाच जादा फौजफाटा कोर्टाच्या इमारतीभोवती तैनात केला आहे. यापूर्वी याकूब मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश दीपक मिश्रा यांना धमकीचे पत्र आले होते. हे पत्र त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला सापडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर याकूब प्रकरण हाताळणाऱ्या सर्व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा दिल्ली पोलिसांनी आढावा घेतला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा