लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्या लष्करप्रमुख म्हणून होणाऱया नियुक्तीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने रवी दास्ताने यांची याचिका फेटाळून लावली त्याचबरोबर अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही दास्ताने यांच्या याचिकेला विरोध दर्शविला.
दलबीर सिंग सुहाग हे सध्या उपलष्करप्रमुख असून लेफ्टनंट जनरल पदाच्या अधिकाऱयांमध्ये ते सर्वांत वरिष्ठ आहेत. सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्याकडून सुहाग हे ३१ जुलै रोजी लष्करप्रमुख पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. सुहाग यांच्या नियुक्तीबाबत पक्षपातीपणा झाला असल्याचा आरोप दास्ताने यांनी याचिकेतून केला होता. न्यायालयाने मात्र दास्ताने यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा