माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. तेजिंदर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सिंग यांना नोटीस बजावण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी नऊ डिसेंबरला होणार आहे.
व्ही. के. सिंग यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी तेजिंदर सिंग यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही व्ही. के. सिंग सातत्याने आपली बदनामी करीत असल्याचा दावा तेजिंदर सिंग यांनी याचिकेमध्ये केला आहे.
टेट्रा ट्रक व्यवहारामध्ये तेजिंदर सिंग यांनी आपल्याला लाच देण्याची तयारी दाखविली होती, असा आरोप व्ही. के. सिंग यांनी त्यांच्यावर केला होता. यानंतर तेजिंदर सिंग यांनी व्ही. के. सिंग यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला.