संपत्तीच्या वादातून स्वत:च्या पाच मुलींची हत्या केल्याप्रकरणी मगनलाल बरेला याला फाशी देण्यास पुढील आदेश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याला गुरुवारी सकाळी फासावर लटकवण्यात येणार होते.
सरन्यायाधीश पी सतशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मगनलालच्या फाशीला स्थगिती दिली. बरेलाच्या फाशीविरोधात मानवाधिकार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संघटनेचे कार्यकर्ते सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बरेलाच्या फाशीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर जबलपूर येथील तुरुंग प्रशासनाला तातडीने याबाबत निर्णय कळवण्यात आला. आपल्या दोन पत्नींशी संपत्तीवरून झालेल्या वादात ११ जून २०१० रोजी मगनलालने कुऱ्हाडीने आपल्या पाच मुलींची हत्या केली होती. मध्य प्रदेशातील सेओरा येथे ही घटना घडली होती. त्याला जबलपूर येथील मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी फाशी दिले जाणार होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा