SC on Well Near Shahi Jama Masjid : संभल जिल्ह्यातील वादग्रस्त शाही जामा मशिदीजवळ असलेल्या विहिरीबाबत संभल नगरपालिकेने नोटीस बजावली होती. या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसंच, दोन आठवड्यांत स्थिती अहवाल मागवण्यात आला आहे. ही विहिर सरकारी जमिनीवर असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि संजय कुमार यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोटीस जारी करताना अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संभल जिल्हा प्रशासन शहरातील जुनी मंदिरे आणि विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक मोहीम राबवत आहे, ज्याच्या अहवालात असं दिसून आलंय की कमीत कमी ३२ जुनी मंदिरे आणि १९ विहिरी पुनर्जीवित करण्यात आली आहेत. या विहिरी सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात येणार असल्याची अशी नोटीस संभल नगरपालिकेने लावली आहे. त्यापैकी एक विहिर संभल येथील मशि‍दीजवळ आहे. त्याचा वापर मशि‍दीच्या कामासाठी केला जात असल्याचं मशिद समितीतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी म्हणाले. तसंच, अनादी काळापासून या विहिरीतून पाणी काढत असल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु, या नोटीशीलाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती लावली आहे.

अहमदी यांच्या या दाव्यावर वरिष्ठ वकिलांनी आक्षेप घेत येथे हरि मंदिर असल्याचा प्रतिदावा करून आता विहिरीतील पाणी पूजा, अंघोळ आणि इत्यादीसाठी वापरले जाईल, असं म्हटलं. परंतु, अशा कोणत्याही उपक्रमांना येथे परवानगी दिली जाणार नाही, त्यासाठी आधी स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

हेही वाचा >> Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

अनादी काळापासून विहिरीचा वापर

मशिद समितीतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना सांगितले की, आम्ही अनादी काळापासून विहिरीतून पाणी काढत आलो आहोत. तर, हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, ही विहीर मशि‍दीच्या कक्षेबाहेर आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या तिचा उपयोग पूजा करण्याकरता केला जातो. परंतु, अमहदी यांनी गुगल अर्थ मॅप दाखवत विहिर अंशतः मशिदीत आणि काही प्रमाणात बाहेर असल्याचा दावा केला.

तर युपी सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज म्हणाले, ही विहीर सरकारी जमिनीवर आहे. यावर अमहदी यांनी राज्य पक्षपाती असल्याचा आरोप केला. दरम्यान, शांतता आणि सौहार्द राखण्यासाटी बारीक लक्ष ठेवून असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले.

दरम्यान, हिंदू याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना वकील विशू शंकर जैन म्हणाले, लोक विहिरीची पूजा करत होते आणि त्याचे फोटो आहेत. त्यावर न्यायालयाने हे फोटो रेकॉर्डवर ठेवण्याची सूचना केली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, मशि‍दीच्या पायऱ्या आणि प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खासगी विहिरीच्या संदर्भात यथास्थित कायम राहील.