मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. शोभ डे यांचे ट्विट हक्कभंग कसा, यासंदर्भात स्वतःची बाजू आठ आठवड्यांत मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना दिले आहेत. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत यांच्या पीठाने हे आदेश दिले.
प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणे अनिवार्य करण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखविण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचे असल्याचे ट्विट केले होते. विधानसभेत लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसेच डे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील केली. मात्र या नोटीसबाबतही डे यांनी ट्विट केले की,”माफी मागण्यासाठी हक्क भंगाची नोटीस बजावली? कम ऑन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc stays privilege motion notice by maha assembly against shobhaa de