Kolkata Crime : कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं ( Kolkata Crime) प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या मन सून्न करणाऱ्या घटनेने सगळा देश हादरला आहे. या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पीडित डॉक्टर तरुणीची ( Kolkata Crime ) ओळख जाहीर केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिला आहे. आर. जी. कर महाविद्यालयात ९ ऑगस्टला डॉक्टर महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात असो किंवा इतर कुठल्याही अत्याचार प्रकरणात असो बलात्कार पीडितेची ओळख कुणीही जाहीर करता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने?

आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ज्या डॉक्टरची बलात्कार करुन हत्या ( Kolkata Crime ) करण्यात आली त्या डॉक्टराचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतो आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला आहे. अनेक युजर्स या मुलीच्या नावासह तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत ही बाद क्लेशदायक आहे. घटना घडल्यानंतर पुढच्या ४८ तासांमध्ये या महिला डॉक्टरचा फोटो व्हायरल झाला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

RJ Kar Hospital
Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Rape On Minor Girl
Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
minor student raped by school bus driver in chandigarh
Chandigarh : संतापजनक! कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक
Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape and Murder : “९ ऑगस्ट पूर्वी आम्ही १६० जणी होतो, आता..”; आर.जी. कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरांना भीतीने ग्रासलं
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

हे पण वाचा- Kolkata Rape and Murder : “९ ऑगस्ट पूर्वी आम्ही १६० जणी होतो, आता..”; आर.जी. कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरांना भीतीने ग्रासलं

कोलकाता येथील आर. जी. कर आरोग्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात पीडित महिला डॉक्टरची ( Kolkata Crime ) ओळख जाहीर केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर ९ तारखेच्या रात्री बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन महिला डॉक्टरांनी अफवा पसरवण्याचं काम केलं असाही आरोप भाजपाच्या आमदार लॉकेट चटर्जींनी केला आहे.

बलात्कार पीडितेची ओळख जाहीर केल्यास काय शिक्षा होते?

१) बलात्कार पीडितेची ओळख, फोटो, नाव जाहीर करणं हा कायद्याने गुन्हा आहे.

२) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या तरतुदीनुसार हा गुन्हा आहे

३) भारतीय न्याय संहितेच्या कलम ७२ च्या अन्वये बलात्कार पीडितेची कुठल्याही प्रकारे ओळख जाहीर केली, तिचं नाव छापलं, फोटो व्हायरलल केला तर किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

बलात्कार पीडितेची ओळख का जाहीर केली जात नाही?

सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणं हा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. यामागे एकच कारण नाही तर अनेक कारणं असतात. बलात्कार पीडितेची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच ज्या पीडितेवर बलात्कार झालेला असतो ती मानसिकरित्या कोसळून गेलेली असते. तिची ओळख जाहीर झाली तर तिची बदनामी होते. त्याचप्रमाणे तिच्याकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. पीडितेने स्वतःला आणखी एका तणावात ढकलू नये म्हणून तिची ओळख जाहीर केली जात नाही. द मिंटने हे वृत्त दिलं आहे.