दहशत पसरवून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱया इसिस संघटनेमध्ये ‘जिहादी जॉन’ नावाने परिचित असलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, महम्मद एमवाजी असे त्याचे नाव असल्याचे उघड झाले आहे. एमवाजीचे लहानपण पश्चिम लंडनमध्ये गेले असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्याचे लहानपणातील काही फोटोही ‘डेली मेल’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहेत.
एमवाजीला लहानपणी व्हिडिओ गेम्स खेळण्याचा शौक होता आणि तो मार्शल आर्ट्सचेही प्रशिक्षण घेत होता. लहानपणी एमवाजीचे वर्तन इतर लहान मुलांसारखेच होते. पुढे जाऊन तो एका दहशतवादी संघटनेत सहभागी होईल, याची त्यावेळी कोणी कल्पनाही केली नसेल. लंडनमध्ये त्याच्या शेजारी राहणाऱया नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तो त्यावेळी खूप शांत आणि सभ्य मुलगा म्हणून ओळखला जायचा. तो ज्या वर्गात शिकत होता. तिथे तो केवळ एकच मुस्लिम विद्यार्थी होता. त्यावेळी त्याला फुटबॉल खेळण्याची खूप आवड होती, अशीही माहिती समजली असून, मॅंचेस्टर युनायटेड या क्लबचा तो चाहता होता.
एमवाजीचा जन्म कुवेतमध्ये झाला त्यानंतर १९९३ मध्ये तो कुटुंबियांसमवेत लंडनमध्ये राहायला गेला. लंडनमध्ये राहायला गेल्यावर तो कुटुंबियांसमवेत तेथील मशिदींमध्ये नमाजपठणासाठी जात होता. मात्र, त्याचे राहणीमान एकदम पाश्चिमात्य शैलीचे होते, असेही दिसून आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा