तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडालेल्या बसमधून ३० विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक रहिवाश्यांनी मुलांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. महबूबनगरमध्ये काल (गुरुवारी) मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
पाण्याच्या पातळीचा अंदाज चुकला
भाश्याम टेक्नो स्कूलची बस रामचंद्रपुरमहून सुगुरगड्डा थांडाकडे जात होती. मन्याकोंडा रेल्वे स्थानकाजवळ ही बस येताच या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बस ड्रायवरला सुरुवातीला वाटले की पाण्याची पातळी कमी आहे त्यामुळे बस या पाण्यातून जाऊ शकते. मात्र, पाच फूट पेक्षा जास्त पाणी असल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त बस पाण्यात बुडाली. यावेळी बसमध्ये ३० विद्यार्थी होती.
हेही वाचा- VIDEO: उद्घाटनानंतर २४ तासातच फुटला नर्मदा कालवा, ‘गुजरात मॉडेल’वरून काँग्रेसची खोचक टीका
ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढले
बस पाण्यात बुडाल्याचे पाहताच स्थानिक रहिवाश्यांनी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. स्थानिक रहिवाश्यांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.