शाळा विकास समितीच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधील गणेश चतुर्थीची पोस्ट डिलीट केल्याने पालकांनी थेट शाळेबाहेर आंदोलन केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सरकारी शाळेच्या मुख्यध्यापकाला अटक केली आहे. मोहम्मद शफीक असं या मुख्यध्यापकाचं नाव आहे. राजस्थानमधील कोटा मध्ये ही घटना घडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यध्यापकाने डिलीट केली व्हाट्सअॅप ग्रुपमधील पोस्ट
हिंदुस्तान टाईम्सने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शाळा विकास समितीच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधील काही पालकांनी गणेश चतुर्थी निमित्त पोस्ट शेअर केली होती. मात्र, शाळेच्या मुख्यापकांनी ही पोस्ट डिलीट केली. सुरुवातीला त्यावर पालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर दोन तासांनी अन्य एका पालकाने पुन्हा एकदा पोस्ट शेअर केली. ती पोस्ट सुद्धा मुख्यध्यापकाने डिलीट केली. यावर ग्रुपमधील पालकांनी आक्षेप घेतला.
शाळेबाहेर पालकांचे आंदोलन
याप्रकरणी दुसऱ्या दिवशी पालकांनी शाळेत जाऊन मुख्यदाराजवळ आंदोलन केले. तसेच मुख्यध्यापकाला जाब विचारला. या आंदोलनात काही हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
पालकांच्या तक्रारीनंतर मुख्यध्यापकाला अटक
पालकांच्या तक्रारीनंतर आता शाळेच्या मुख्यध्यापकाला अटक केली आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित शाळेचे मुख्यध्यापक अल्पसंख्यक समाजाचे आहेत. शुक्रवारी त्यांनी शाळा विकास समितीच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छांची पोस्ट डिलीट केली. तसेच पोस्ट शेअर करणाऱ्या पालकांना ब्लॉक केले. त्यामुळे पालकांनी संप्तत प्रतिक्रिया देत मुख्यध्यापकाविरोधात तक्रार दाखली. याप्रकरणी आम्ही शाळेच्या मुख्यध्यापकाला अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत त्यांना अटक केली आहे, याप्रकरणाचा पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक उत्तम सिंग यांनी दिली.