Purdah Project in Science Exhibition by A Girl Student : शालेय विद्यार्थ्यांच्या साामजिक, वैज्ञानिक विचारांत प्रगती व्हावी, त्यांना संशोधनाला चालना मिळावी, लोकांमध्ये मिसळण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची सवय व्हावी म्हणून शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे, प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. पण अशाच प्रदर्शनातून जर धार्मिक तेढ निर्माण होणारे भाषणं किंवा तत्सम गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्या तर? कर्नाटकातील चामराजनगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शालेय प्रदर्शनात मुलीने बुरखा पद्धतीवर भाष्य केलं आहे. हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे हे समजू शकलेले नसले तरीही सार्वजनिक शिक्षण उपसंचालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
संबंधित मुलीने विज्ञान प्रदर्शनात चक्क ‘पडदा’ या विषयावर प्रकल्प सादर केला. आझब-ए-खब्र असं तिच्या प्रकल्पाचं नाव होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये, मुलगी म्हणतेय की, “पडद्यामागे राहणारी स्त्री रक्त सांडणाऱ्या शहीदासारखी पवित्र असते. पडद्यामागे राहणारी स्त्री, ती कोणतेही हलाल काम करण्यास सक्षम असते आणि पडदा हा अडथळा नाही, तर तिला जन्नतकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे.”
अशा पतीची अल्लाह प्रार्थना स्वीकारत नाही
ती पुढे म्हणते, “पडद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्त्रीला पुरूष दिसत नाही आणि पुरूष तिला पाहत नाही. जी स्त्री पडद्याशिवाय फिरते आणि जो नवरा तिला प्रश्न विचारत नाही, त्यांना जोडपे म्हणता येणार नाही. जो कोणी आपल्या पत्नीला पडद्याशिवाय राहू देतो तो दय्यूस (विचित्र) आहे आणि अल्लाह अशा व्यक्तीची प्रार्थना स्वीकारत नाही.”
शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंत राज्याच्या शिक्षण विभागानेही भुवया उंचावल्या. त्यामुळे, चामराजनगर येथील सार्वजनिक शिक्षण उपसंचालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.