आधार कार्ड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही अशा शब्दांमध्ये आधार कार्ड बनविणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) देशातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बजावले. बहुतांश शाळांनी विद्यार्थ्य़ांना आधार कार्डची सक्ती केली होती, यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षणापासून लांब रहावे लागत होते. आता यूआयडीएआईने याविरोधात पाऊल उचलले असून केवळ आधारकार्ड नाही म्हणून देशातील एकाही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊ नये असे आमचे धोरण आहे असं युआयडीआयने स्पष्ट केलं आहे.

कोणत्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी अन्य कागदपत्रांचा वापर करावा, पण कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवू नये, अशा प्रकारची शाळांची मनमानी बेकायदेशीर आहे, असंही यूआयडीएआयने म्हटलं आहे.
शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विभागातील बँका, पोस्ट कार्यालये, राज्याचा शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधावा आणि आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असंही यूआयडीएआयने सांगितलं.मुलांना आधार नसल्यामुळे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे यूआईडीएआईने म्हटले आहे. याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे.