लेसर किरणांच्या मदतीने मानवी तसेच प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्याची नवी पद्धत शोधणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ रंगास्वामी श्रीनिवास यांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते तंत्रज्ञान आणि नवीन शोधासाठी असलेले अमेरिकेचे मानाचे राष्ट्रीय पदक समारंभपूर्वक बहाल करण्यात आले. रंगास्वामी यांनी सॅम्युएल ब्लम आणि जेम्स वेन्न यांच्यासह हे पदक ओबामांकडून स्वीकारले.
श्रीनिवास यांनी विज्ञान शाखेची पदवी तसेच पदविका मद्रास विद्यापीठातून १९४९ आणि १९५० साली घेतली होती. तर १९५६ मध्ये त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी घेतली होती. त्यांच्या नावावर सध्या २१ अमेरिकी पेटंट्स आहेत. आयबीएमच्या टी जे संशोधन केंद्रात त्यांनी ३० वर्षे काम केले.
व्हाइट हाऊस येथे शुक्रवारी आयोजित शानदार समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.

Story img Loader