भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती ही लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या माहितीबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना विचारले असता ही माहिती भारताबाहेरून हॅक झाली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाबद्दल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी नौदल प्रमुखांना दिले आहेत. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती रात्री बारा वाजताच्या सुमारास समजली आहे. पाणबुड्यांबद्दल नेमकी कोणती माहिती लीक झाली आहे ही माहिती काही प्रमाणात लीक झाली की सगळीच महत्त्वाची माहिती लीक झाली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.  चौकशी करून लवकरच या प्रकरणातील सत्य समोर आणले जाईल असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे नौदलाने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ही माहिती भारतातून नाही तर भारताबाहेरून उघड झाली असल्याची  नौदलाने स्पष्ट केले. तसेच लीक झालेली कागदपत्रे ही आताची नसल्याचेही त्यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. या कंपनीला भारताच्या स्कॉर्पिअन पाणबुड्या बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे भारतीय पाणबुड्यांबद्दलची  गोपनीय माहिती देखील लीक करण्यात आलीअसून ही माहिती भारतातूनच उघड झाल्याचा दावा देखील ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा