इंग्लंडपासून स्वतंत्र व्हायचे की इंग्लंडसोबतच राहायचे या मुद्दय़ावरील मतदानाला गुरुवारी सकाळी स्कॉटलंडमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. स्कॉटलंडमधील सुमारे ९७ टक्के नागरिक या मतदानात सहभागी होऊ शकणार आहेत. या सार्वमताचा निकाल काय लागेल याची उत्सुकता जगभर असून तो काहीही लागला तरी इंग्लंडचे राजकारण व अर्थकारण यामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विविध सर्वेक्षणांमध्ये या निवडणुकीत ‘एकत्र राहू इच्छिणाऱ्यांचे’ पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत.
कॅमरून आव्हान
या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी केली गेली आहे. ही ‘एकमेवाद्वितीय’ संधी असून ती दवडू नका, असे कळकळीचे आवाहन स्वतंत्र होऊ इच्छिणारे नेते आपल्या अनुयायांना करीत आहेत. तर स्कॉटलंड वेगळा झाला तर त्याच्या आर्थिक जखमा गंभीर असतील, असा इशारा एकत्र राहू इच्छिणाऱ्यांचे प्रतिनिधी व इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा