ब्रिटनची राणी केट गरोदर असल्याची बातमी उघड करणाऱ्या भारतीय वंशाची परिचारिका जेसिका सलढाणाच्या आत्महत्येप्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलीस लवकरच ‘त्या’ ऑस्ट्रेलियन रेडियो निवेदकांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
सिडनीमधील ग्रेग आणि ख्रिस्टीन या  दोघा रेडियो निवेदकांनी बुधवारी पहाटे किंग एडवर्ड रुग्णालयात ब्रिटनची राणी आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या आवाजाची नक्कल करत केटच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्या चौकशीदरम्यान सलढाणा यांनी केट गरोदर असल्याची माहिती रेडिओ निवेदकांना दिली.
ही माहिती उघड झाल्यानंतर तीन दिवसांतच सलढाणा यांचा मृतदेह किंग एडवर्ड रुग्णालयाजवळ सापडला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी ग्रेग आणि ख्रिस्टीन या दोघा निवेदकांची चौकशी करण्याचा निर्णय स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी घेतला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन पोलिसांना औपचारिक विनंती करण्यात आल्याची माहिती स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने दिली.
दरम्यान बनावट दूरध्वनी करणाऱ्या दोन्ही रेडिओ निवेदकांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटकातील उडपीच्या रहिवासी असलेल्या सलढाणा आपल्या दोन मुलांसह दहा वर्षांपूर्वी लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या.    
प्रकरण काय?
सिडनीमधील ग्रेग आणि ख्रिस्टीन या दोघा रेडियो निवेदकांनी बुधवारी पहाटे किंग एडवर्ड रुग्णालयात ब्रिटनची राणी आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या आवाजाची नक्कल करत केटच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्या चौकशीदरम्यान सलढाणा यांनी केट गरदोर असल्याची माहिती रेडिओ निवेदकांना दिली. ही माहिती उघड झाल्यानंतर तीन दिवसांतच सलढाणा यांचा मृतदेह किंग एडवर्ड रुग्णालयाजवळ सापडला.

Story img Loader