पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. इस्रोच्या या मोहिमेचे केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साईटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले होते. आता आंतरराष्ट्रीय संघटनेने या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

चंद्रयान-३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या सात महिन्यांनी आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. यामध्ये प्लॅनेटरी नामांकनानुसार चंद्रयान-३ चे विक्रम लँडर जिथे उतरले, त्या लँडिंग साईटच्या ‘शिवशक्ती’ नावाला मान्यता दिलेली आहे. यानंतर आता अधिकृतरित्या जगभरात चंद्रयान-३ जिथे उतरले, त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ नावाने ओळखले जाणार आहे. त्यामुळे ही भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा >>>मी माझ्या गाण्यांतून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार – नेहा राठोड

दरम्यान, शिवशक्ती आणि तिंरगा पॉईंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे. ‘शिवशक्ती’ नाव देण्यावरून काहीही वाद नाही. चंद्रयान-३ जिथे उतरले, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिले? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, अशी प्रतिक्रिया इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावेळी दिली होती. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sealed by an international organization on the name chandrayaan 3 landing site shiva shakti amy