पीटीआय, पूँछ, जम्मू

जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी जंगल भागाची घेराबंदी करून मोठय़ा प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकानेही तिथे भेट दिली.सोळाव्या कोअरचे प्रमुख (जीओसी) लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळाला भेट देऊन वरिष्ठ लष्करी व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हेलिकॉप्टरने हवाई पाहणी करण्याबरोबरच श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

दहशतवाद्यांनी गुरुवारी दुपारी ढेरा की गली आणि बुफ्लियाजदरम्यान धात्यार मोढ येथे वळणावर केलेल्या हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते आणि अन्य दोघे जखमी झाले होते. तीन ते चार दहशतवाद्यांनी डोंगराच्या वरील भागात लपून वळणावरून जाणाऱ्या लष्करी वाहनांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर ढेरा की गली रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांनी किमान दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली आणि त्यांच्याकडील काही हत्यारेही पळवली. हल्ला कोणत्या प्रकारे करण्यात आला याचा शोध घेण्यासाठी त्या जागेचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>“तुमचं प्रभावी नेतृत्व…”, इंदिरा गांधींनी १९७१ साली सॅम माणेकशाँना लिहिलेलं पत्र व्हायरल

‘गुप्तचर जाळे मजबूत करण्याची गरज’ जम्मू भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा व्यवस्थापन आणि गुप्तचर जाळे तातडीने मजबूत करावे अशी मागणी सुरक्षातज्ज्ञांनी केली आहे. या समस्येवर तातडीने चर्चा व विश्लेषण करण्याची गरज आहे असे सोळाव्या कोअरचे माजी प्रमुख लेफ्ट. जनरल (नि.) परमजित सिंग यांनी सांगितले. तस्कर, अमली पदार्थाचे विक्रेते आणि व्यवस्थेतील लोकांची युती मोडून काढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या दोन वर्षांमध्ये येथे ३५ जवान शहीद झाले आहेत. काय चालले आहे? दहशतवाद्यांमध्ये इतके धाडस कुठून आले? – कर्नल एस एस पठाणिया, सुरक्षातज्ज्ञ

पाकिस्तान या भागात दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या लढण्याच्या पद्धतीत काहीतरी दोष आहे. –  कॅप्टन (नि.) अनिल गौर, सुरक्षातज्ज्ञ