जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी संशयित दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने यांदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारतीय लष्कराच्या एक्स हँडलने केलेल्या पोस्टनुसार, पूंछमधील कृष्णा घाटीजवळील जंगलातून शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता वाहनांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुरक्षा बैठकी नुकतीच झाली. दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यासाठी नवीन वर्षासाठी दहशतवादविरोधी ऑपरेशन प्लॅन तयार करण्यासाठी ही बैठक झाली होती. या बैठकीनंतरच संशयित दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला.

काही दिवसांपूर्वी पूंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. २१ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका गटाने पूंछ जिल्ह्यातील धत्यार मोरजवळील अंध वक्र येथे लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF)ने या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून छायाचित्रेही जारी केली होती, ज्यात अत्याधुनिक यूएस-निर्मित M4 कार्बाइन असॉल्ट रायफल्सचा वापर दर्शविला होता.

Story img Loader