पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास एक अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात दाखल झाला होता. तसेच रात्रभर त्याच ठिकाणी होता. हा प्रकार पहाटे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या परिसरात एक अनोळखी व्यक्ती दाखल झाला होता. हा प्रकार पहाटे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आला. हा व्यक्ती कोण होता आणि येथे येण्यामागे काय उद्देश होता, याची चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. तसेच प्राथमिक तपासात हा व्यक्ती चोर असावा किंवा मानसिक आरोग्य स्थिर नसलेली व्यक्ती असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एक दुहेरी हत्याकांड घडले होते. मुख्यमंत्री निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर राहत असलेले व्यावसायिक अलोक शहा आणि त्यांच्या पत्नी रश्मिका शहा यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. चौकशी दरम्यान, या परिसरातील सीसीटीव्ही देखील निकामी करण्यात आले असल्याची बाब पुढे आली होती.

Story img Loader