जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात सोमवारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दोघेही ‘हिज्बुल’च्या वरच्या फळीतील दहशतवादी होते. एकाचे नाव समीर अहमद भट उर्फ समीर टायगर असून हा हिज्बुल मुजाद्दीनदचा कमांडर स्तराचा A++ दर्जाचा दहशतवादी होता. तर दुसऱ्याचे नाव अकीब खान असून तोदेखील वरच्या फळीतील दहशतवादी होता. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराचे दोन जवानही जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चकमकीआधी जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसारच हा परिसर रिकामा करण्यात आला आणि शोधमोहिम हाती घेण्यात आली होती, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. शोधमोहिम सुरू असताना जवानांना दहशतवाद्यांना शोधण्यात यश आले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली, असे त्यांनी सांगितले.