पीटीआय, श्रीनगर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू व्हायला एका आठवड्याचा अवधी असताना, यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल यांनी शनिवार दिली. यात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढल्यामुळे अमरनाथ यात्रा आणि यात्रेकरूच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी यात्रा जाणार असलेल्या जम्मू-श्रीनगर महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यात्रेवर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास तो उधळून लावण्यासाठी अत्युच्च दर्जाची दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नड शिकावी, दुसऱ्या भाषा..”, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी काय आवाहन केलं?

दुसरीकडे, श्रीनगरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ‘राजभवन’मधून अमरनाथच्या प्रथम पूजेमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला. २९ जूनला यात्रा सुरू झाल्यानंतर देशभरातील भाविकांसाठी दूरदृश्य पद्धतीने दर्शनाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी देवस्थान समिती आणि प्रशासनाने विशेष व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. या यात्रेला सर्वधर्मीयांनी नेहमीच पाठिंबा दिला असल्याचे ते म्हणाले.

ही यात्रा ५२ दिवस चालणार असून ती दोन मार्गांनी जाईल. अनंतनाग जिल्ह्यातील नुनवान-पहलगाम हा ४८ किलोमीटर लांबीचा पारंपरिक मार्ग आणि गांदरबलमध्ये १४ किलोमीटर लांबीचा लहान पण उंच चढाईचा मार्ग, अशा दोन मार्गांनी यात्रा जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security is tight before amarnath yatra amy
Show comments